आज मुंबईसह देशभरात सर्वांच्या लाडक्या लंबोदराच्या जयंती निमित्त माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात अनेक माघी गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन केले. चला मग पाहूया मुंबईतील काही नामांकित माघी गणेशोत्सव मंडळ.
डोंबिवलीचा इच्छापूर्ती
मुंबईसह कल्याण डोंबिवली येथे प्रसिद्ध असलेल्या ओम श्रद्धा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. यंदाचे हे मंडळाचे ११ वे वर्ष असून मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांनी या मंडळाची मूर्ती साकारली आहे . यंदा या मंडळाची शुभ आणि लाभ सोबत बाप्पा विराजमान झाले आहे. यंदा
शिव शंकराचा पुत्र श्री गणेशाचा विवाह प्रजापती विश्वकर्माच्या मुली रिद्धी आणि सिद्धी या दोन मुलींसोबत झाला होता. सिद्धी पासुन “क्षेम” आणि रिद्धी पासून “लाभ” नावाचे पुत्र झाले. लोक-परंपरेने यांना शुभ-लाभ असे म्हंटले जाते.गणेश पुराणात शुभ आणि लाभ याना केशं किंवा लाभ या नावानी सुद्धा ओळखलं जातं.
पोयसरचा महागणपती
दर वर्षी आपल्या विविध मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवतेज युवा मित्र मंडळ अर्थात पोयसरचा महागणपती या नावाने प्रसिद्ध आहे . कांदिवली पूर्व येथे हे मंडळ असून यंदा हे मंडळाचे १० वे वर्ष आहे. या वर्षी रिद्धी सिद्धी सह बाप्पा मंडळात विराजमान होणार आहे.
चारकोपचा राजा
माघी गणेशोत्सवात मुंबईत अनेक मंडळ आहेत . मुंबईत माघी गणेशोत्सवात मानाचा बाप्पा शिस्तबद्ध आगमन विसर्जन असणारे असे कांदिवली चारकोपचा राजा माघी गणेशोत्सव मंडळ. यंदा हे मंडळाचे १४ वे वर्ष असून मुम्बातील प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी यांनी या मंडळाची मूर्ती साकारली आहे. उत्सव सह अनेक सामाजिक उपक्रमात देखील हे मंडळ अग्रेसर आहे