Voice of Eastern

मुंबई :

महानंद दुग्धशाळेचे ‘घी’ दुबईसह मध्य आशियाई या आखाती देशामध्येही आता उपलब्ध होणार आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आखाती देशामध्ये महानंदचे घी निर्यात करण्यास २८ जानेवारीला सुरुवात करण्यात आली.

आखाती देशामध्ये महानंदचे ‘घी’ निर्यात करण्यासाठी मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडिया लिमिटेड यांना प्राधिकृत निर्यातदार संस्था म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, दूध महासंघाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

महानंद दुग्धशाळा आणि मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडिया लिमिटेड यांना महापौर किशोर पेडणेकर यांनी शुभेच्छा देताना महानंदसाठी पालिकेकडून शक्य ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी १८ ऑगस्ट १९८३ रोजी महानंद दुग्धशाळेची स्थापना झाली. दूध महासंघाचे ८५ तालुका किंवा जिल्हा सभासद आहेत. हा दूध महासंघ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. महासंघाचे आम्रखंड, श्रीखंड व पनीर, लस्सी, छास, सुगंधीत दूध, तूप, ताक व दही इत्यादी दुध व दुग्धजन्य पदार्थ हे ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts

मुंबई महापालिकेकडून ९ किलो मावा, ६३ किलो भेसळयुक्त मिठाई नष्ट

रामदास पठारमध्ये लवकरच फुलणार नंदनवन – रायगड पालकमंत्री आदिती तटकरे

घरातून बाहेर काढले म्हणून काकाने रचला दरोड्याचा कट

Leave a Comment