Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

महाराष्ट्र व आसाम सांघिक गटात विजयी तर पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा डबल धमाका

banner

दादर :

दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरु असलेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या आंतर राज्य सांघिक गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारली. नव्या फळीतील खेळाडूंनी हि किमया केली. महाराष्ट्राने तामिळनाडूवर २-१ असा विजय मिळविला. तामिळनाडूच्या जे. अभिन्याने महाराष्ट्राच्या आकांक्षाला २१-१६, २४-११ असे सहज परभूत करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु तीन सेटपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या केशर निर्गुणने तामिळनाडूच्या अविष्काला ५-२५, २५-१५ व २५-० असे पराभूत करून बरोबरी केली. तर दुहेरीत महाराष्ट्राच्या श्रुती सोनावणे व मैत्रेयी गोगटेने तामिळनाडूच्या एल.अम्मा शवर्थिनी व वी मिथराला जोडीला १५-११, १६-२२ व १७-१५ असे नमवून महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले.

आसामच्या संघाने किमया करत उत्तरप्रदेश संघावर २-१ अशी मात करून अंतिम विजय मिळविला. भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत या स्पर्धेतील पुरुषच्या सांघिक गटात आसामच्या सोनू चौधरीने उत्तर प्रदेशच्या महम्मद आरिफला २५-६, २५-५ असा विजय मिळविला. तर उत्तर प्रदेशच्या अब्दुल रेहमानने आसामच्या जुगल किशोर दत्ताला २२-४, २५-१० असे पराभूत करून बरोबरी साधली. निर्णायक तिसर्‍या सामन्यात आसामच्या बिकी सिंग व मुजबीर रेहमान जोडीने उत्तर प्रदेशच्या उमर तन्वीर व महम्मद शाहू जोडीवर मात करून संघाला विजयी करून दिले.

हिंदुस्थान पेट्रोलियम, युनियन बँक, ओ एन जी सी, इंडियन ऑइल व बँक ऑफ इंडिया सह पुरस्कृत या स्पर्धेतील आंतर संस्था पुरुष व महिला सांघिक गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाने दुहेरी यश मिळविले. पुरुष संघाने रिझर्व्ह बँकेवर २-१ असा विजय मिळविला तर महिलांच्या संघानेही रिझर्व्ह बँकेच्या संघावरच २-१ असाच निसटता विजय मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आंतर संस्था पुरुष सांघिक गट अंतिम फेरीचे निकाल

  • प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि महम्मद घुफ्रान ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड )२५-०, १९-२४ व २५-७
  • झहीर पाशा ( रिझर्व्ह बँक ) पराभूत विरुद्ध के श्रीनिवास ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) १०-२५, २५-१७ व १७-२१
  • सूर्य प्रकाश व रवी वाघमारे ( रिझर्व्ह बँक ) पराभूत विरुद्ध के बाबू व योगेश परदेशी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) १४-२५, ७-२३

आंतर संस्था महिला सांघिक गट अंतिम फेरीचे निकाल

  • काजल कुमारी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) पराभूत विरुद्ध कविता सोमांची ( रिझर्व्ह बँक ) ६-२४, १३-१८
  • रश्मी कुमारी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) वि वि अंबिका हरीथ ( रिझर्व्ह बँक ) २५-०, २४-१८
  • एस. ईलवझकी व परिमला देवी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) वि वि संगीता चांदोरकर व उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २५-१, १०-१८ व २५- १६

Related posts

मुंबईसह राज्यात उभारणार इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन

असे असेल पेट परीक्षेचे नवे वेळापत्रक

Voice of Eastern

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Voice of Eastern

Leave a Comment