ठाणे :
गफूर शेखची दमदार फलंदाजी आणि आरीब डोलारेच्या गोलंदाजीमुळे महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी संघाने मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाचा १० धावांनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत विजय नोंदवला.
महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरला. गफूर शेखची ५० धावांची अर्धशतकी खेळी, भाविक ठक्कर च्या ३३, अनुराग मौर्यच्या ३० आणि अल्पेश पाटीलच्या २२ धावांमुळे महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीने ३७ षटकात ९ बाद २२२ धावसंख्या उभारली. रोहित ठाकुरने ४१ धावांत ३ आणि सिद्धेश पडेलने २२ धावांत २ विकेट्स मिळवल्या. त्यानंतर फलंदाजीत छाप पाडताना सिद्धेश पडेलने नाबाद ५८ आणि विनय यादवने ८२ धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाजांकडून पाहिजे तशी साथ न मिळाल्यामुळे मुंबई स्पोर्टिंग युनियनला पराभव पत्करावा लागला. आरीब डोलारेने ४१ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. भाविन दर्जी आणि गफूर शेखने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. गफूर शेखला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी : ३७ षटकात ९ बाद २२२ ( गफूर शेख ५०, भाविक ठक्कर ३३, अनुराग मौर्य ३०, अल्पेश पाटील २२,रोहित ठाकूर ७-४१-३, सिद्धेश पडेल ७-२२-२) विजयी विरूद्ध
मुंबई स्पोर्टिंग युनियन : ३७ षटकात ८ बाद २१२ ( विनय यादव ८२, सिद्धेश पडेल नाबाद ५८, आरीब डोलारे ७-१-४१-३, भाविन दर्जी ७-२-१४-२, गफूर शेख ७-३२-२). सामनावीर – गफूर शेख.