Voice of Eastern

मुंबई :

अहमदाबाद, गुजरात येथे २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कलावधीत होणार्‍या ३६ व्या नॅशनल गेम्स साठी २०२२ च्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष व महिलांचा प्रत्येकी १५ जणांचा संघ जाहीर झाला आहे. पुरुषांमध्ये मुंबई उपनगरच्या ॠषिकेश मुर्चावडेची तर महिलांमध्ये ठाण्याच्या शितल भोरची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या खो-खो संघाची घोषणा सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केली. काही दिवसांपुर्वी पुणे येथे झालेल्या निवड चाचणीतून संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणुक केली होती. पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून पुण्याचे शिरिन गोडबोल, व्यवस्थापक कमलाकर कोळी, तर फिजिओ म्हणून डॉ. अमित रावटे तर महिलांच्या प्रशिक्षकपदी उस्मानाबादचे प्रवीण बागल, सहायक प्रशिक्षक प्राची वाईकर आणि व्यवस्थापक रत्नराणी कोळी यांची निवड झाली आहे, अशी माहिती बाळ तोरसकर यांनी दिली.

संघातील निवड झालेल्या खेळांडूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र संघात तगडे खेळाडू सहभागी असून राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करतील असा विश्‍वास डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केला. तर सचिव अ‍ॅड. शर्मा यांनी खेळाडूंना अव्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुरुष संघ : सुयश गरगटे, प्रतिक वाईकर, मिलिंद कुरपे, राहूल मंडल (सर्व पुणे), अक्षय भांगरे, ॠषिकेश मुर्चावडे (कर्णधार), निहार दुबळे (मुंबई उपनगर), सुरज लांडे, अक्षय मासाळ (सांगली), लक्ष्मण गवस (ठाणे), रामजी कश्यप (सोलापूर), विजय शिंदे (उस्मानाबाद), दिलराज सेनगर (विदर्भ), अविनाश देसाई, सागर पोतदार (कोल्हापूर). राखीव खेळाडू : श्रेयस राऊळ (मुंबई), अभिषेक पवार (नगर), हर्षद हातणकर (मुंबई उपनगर).

महिला संघ : प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, श्‍वेता वाघ (पुणे), रुपाली बडे, रेश्मा राठोड, प्रियांका भोपी, शितल भोर (कर्णधार) (ठाणे), गौरी शिंदे, संपदा मोरे, ॠतुजा खरे, जान्हवी पेठे (उस्मानाबाद), अपेक्षा सुतार, आरती कांबळे (रत्नागिरी), मयुरी पवार (औरंगाबाद), पुर्वा मडके (कोल्हापूर). राखीव खेळाडू : स्नेहल जाधव (पुणे), साक्षी पाटील (सांगली), श्रेया पाटील (कोल्हापूर).

Related posts

महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत राजस्थानला भिडणार

Voice of Eastern

बनावट पत्ते, उत्पन्नाच्या दाखल्यातून आरटीई प्रवेशाचा मार्ग

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज – अजित पवार

Leave a Comment