Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

banner

मुंबई :

उत्तराखंड येथे २८ ते ३१डिसेंबरदम्यान होणार्‍या ‘३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे’साठी महाराष्ट्राने आपले संघ जाहीर केले. नुकत्याच परभणी-पाथरी येथे झालेल्या ‘३२व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे’तून हे संघ निवडण्यात आले. पुण्याच्या धनश्री तेलीकडे किशोरी गटाच्या संघाची, तर परभणीच्या आकाश भांडेकडे किशोर गटाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे हे दोन्ही संघ २५ डिसेंबरला सायंकाळी सचखंड एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीवरून हा संघ उत्तराखंड येथील उदमपूर जिल्ह्यातील नानकपुरी सुद्रापूर येथे स्पर्धेच्या ठिकाणी रवाना होईल. असे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले.

असा असेल किशोरी गट

१)धनश्री तेली -पुणे (कर्णधार), २) श्वेता सावंत -सांगली, ३) आदिती काविलकर – मुंबई शहर, ४) प्रतिक्षा लांडगे – पुणे, ५) श्रावणी भोसले – सांगली (उपकर्णधार) ६) स्नेहल कोळी – कोल्हापूर, ७) नम्रता सावंत – सांगली, ८) ग्रीष्मा वनारसे – पालघर, ९) समिक्षा तुरे – परभणी, १०) स्नेहा पावरा – अहमदनगर, ११) नेहा पांडव – मुंबई उपनगर, १२) संघमित्रा जाधव – नाशिक
प्रशिक्षक – किशोर भोसले (परभणी), व्यवस्थापिका – स्वाती पुंजाळ (सोलापूर).

असा असेल किशोर गट

१) आकाश भांडे – परभणी (कर्णधार) २)सिद्धार्थ मुरूमकर (नंदुरबार), ३)सुयश जौदाळ (कोल्हापूर), ४)नवाज देसाई (सांगली), ५) रोशनकुमार केशी ६) श्रीधर कदम (पुणे), ७) दिगंबर चौधरी (जळगाव), ८)मेहमूद शेख (परभणी), ९) साई चौघुले (मुंबई शहर), १०) विश्वजित साळुंके (नंदुरबार), ११)ओमराज उखारडे (जालना), १२) नौशाद शेख (परभणी).
प्रशिक्षक : संग्राम मोहिते (उस्मानाबाद), व्यवस्थापक : रणजित मस्के (परभणी).

Related posts

आयडॉलच्या एमएमएस, एमसीए प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन अर्ज सुरु

महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कर्नाटक सरकार वारंवार करत आहेत; ताकीद द्या – अजित पवार

“ब्रह्मास्त्र”

Voice of Eastern

Leave a Comment