Voice of Eastern

मुंबई

केंद्र शासनामार्फत गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी  तब्बल २२ सुवर्ण आणि २३ रजत पदके, अशा एकुण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले.

राज्यातून एकुण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकुण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.

पदक विजेते

 •  महाराष्ट्राने- २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकुण ४५)
 • राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६)
 • गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकुण १२)
 • मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकुण ४)
 • गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकुण ३)
 • ओडीशाने २ रजत

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. गांधीनगर येथील प्रादेशिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धकांनी आता राष्ट्रीय स्पर्धेची आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक स्पर्धेची जय्यत तयारी करावी. स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल असे मत प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी व्यक्त केले.

सुवर्ण पदक विजेते

 • मोहम्मद सलमान अन्सारी
 •  रिंकल करोत्रा
 • दिशा सोनवणे
 • कोमल शिवाजीराव कोडलीकर
 • अंकीता अंबाजी गांगुर्डे
 • ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ
 • स्टॅनली सोलोमन
 • योगेश दत्तात्रय राजदेव
 • देवेज्या
 • श्रीराम कुलकर्णी
 • लावण्या पुंड
 • विश्वजित रेवनाथ भुर्के
 • आयुषी अरोरा
 • पुर्वी सिधपुरा
 • गणेश भावे दगडोबा
 • मित्रा राव
 • अर्जुन मोगरे
 • ओंकार गौतम कोकाटे
 • जीवन संपत चौधरी
 • तोजांगण रवींद्र ढाणू
 • विकास चौधरी
 • सजिव कुमार सबवथ

रजत पदक विजेते

 • मिलींद निकम
 • योगेश अनिल खंडागळे
 • सलमान रफीक शेख
 • वेद इंगळे
 • हर्षल गजानन शिरभाते
 • सचिन भारत जाधव
 • वृंदा पाटील
 • सृष्टी मित्रा, यश दिनेश चव्हाण
 • आकांक्षा केलास पवार
 • मिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेग
 • प्रियांका सिद्धार्थ टिळक
 • योगेश दत्तू गनगोडे
 • प्रतिक राजेंद्र हिनघेद
 • आनंद फकिरा घोडके
 • ध्रुव पाटील
 • ओम विनायक गायकवाड
 • अश्लेषा भरत इंगवले
 • अभिशेक भाई पाटील
 • मोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीम
 • आदित्य दीपक हुगे
 • भार्गव कुलकर्णी
 • जुनेद अडेनवाला

Related posts

एनएससीआय स्नूकर ओपनच्या पात्रता फेरीत १२८ क्यूईस्टचा सहभाग

केडीएमसी आयुक्तांनी बूस्टर डोस घेतला आणि तरीही…

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरु

Leave a Comment