Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत राजस्थानला भिडणार

banner

उत्तराखंड : 

महाराष्ट्राच्या मुलांनी ‘३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र राजस्थान संघाशी झुंज देईल. किशोर गटात महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, हरियाणा, बिहार यांनी, तर किशोरी गटात साई, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, यजमान उत्तराखंड, पंजाब यांनी देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली.

उदमपूर जिल्ह्यातील नांकपुरी-सुद्रापूर येथे सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा प्रतिकार ३८-०७ असा सहज मोडून काढला. मध्यांतरालाच २२-०३ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तोच धडाका सुरू ठेवत विजय साकारला. रोशन केशीचा अष्टपैलू खेळ त्याला अंकुश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर यांची मिळालेली चढाईची, तर नवाज देसाई, नौशाद शेख यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला. ओरिसाचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.

मुलांच्या इतर उपउपांत्य सामन्यात  राजस्थानने हिमाचल प्रदेशला ५५-३४; छत्तीसगडने झारखंडचा ५६-२६; आंध्र प्रदेशने तेलंगणाला ४७-४२; हरियाणाने मध्य प्रदेशाला ४५-२४; बिहारने तामिळनाडूला ३९-२७ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

किशोरी (मुली) गटात साईने आंध्र प्रदेशचा ४५-१५; हरियाणाने राजस्थानचा ३०-२५; उत्तर प्रदेशने गोव्याचा २५-१७; बिहारने छत्तीसगडचा ४७-२३; दिल्लीने विदर्भाचा ४३-२३; यजमान उत्तराखंडने हिमाचल प्रदेशचा ४१-३७; पंजाबने चंदीगडचा ३१-२८ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Related posts

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा होणार ऑनलाईन शिक्षण सुरू

Voice of Eastern

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची १०००वी फेरी रवाना

Voice of Eastern

Leave a Comment