Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहरशिक्षण

महाराष्ट्रीय संशोधकांच्या डिसॅबिलिटी रेस्क्यू मॅनेजमेंट सिस्टिमला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

banner

मुंबई :

नैसर्गिक संकट किंवा आपत्तीकाळात दिव्यांग व्यक्तींपर्यंत योग्य सूचना पोहोचवता याव्यात आणि त्यांना संकटकाळात तत्काळ मदतकार्य पोहोचवता यावी यासाठी महाराष्ट्रातील, नवी मुंबईतील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘डिसॅबिलिटी रेस्क्यू मॅनेजमेंट सिस्टिमला’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग (डिसॅबिलिटी) दिवस दरवर्षी ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. दिव्यांग व्यक्तींच्या संघर्षाला सलाम करण्याच्या या दिवशी जर्मन डेव्हलपमेंट कोऑपरेशन, फ्रान्स मधील अटॉस (ATOS), जर्मनीचा ‘मेक आयटी अलायंस’ उपक्रम या ग्लोबल डेव्हलपमेंट पार्टनर्सकडून देण्यात येणारा ‘आय.सी.टी. फॉर इंक्लुजन चॅलेंज २०२२’ हा पुरस्कार डिसॅबिलिटी रेस्क्यू मॅनेजमेंट सिस्टिमला (डीआरएमएस) देण्यात आला. नवी मुंबईतील प्रमोद डबरासे, डॉ. रीना शिंदे, डॉ. सुमित शिंदे, डॉ. सौमिल अशर आणि सुशांत शिंदे या पाच जणांनी ही सिस्टीम विकसित केली आहे.

ज्येष्ठ पिडीयाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त डॉ. सुमित शिंदे म्हणाले, “वातावरणीय बदलांमुळे सामोरं जावं लागणारं संकट असो, वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दिव्यांग (शारीरिक-मानसिक अपंगत्व असलेल्या) व्यक्तींनाच त्याचा सर्वाधिक धोका पोहोचू शकतो. ते नेमके कुठे आहेत या माहितीचा अभाव, अशक्त संवाद वाहिन्या आणि त्यांना सहकार्य करणारी विशिष्ट यंत्रणा या गोष्टींच्या अभावांमुळे संकटाआधी सतर्क करणारी यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि त्यामुळेच ते मदतकार्यापासून वंचित राहतात. अर्थातच, त्यामुळे अशा संकटकाळात त्यांचा मृत्यूदर अधिक असतो.”

“या अत्यंत दुर्लक्षित आणि अत्यंत संवेदनशील आव्हानावर मात करण्यासाठीच चाईल्ड रिॲक्ट फाऊंडेशन आणि सी.एस.ई.डी.आय. (सेंटर फॉर सस्टेनेबल एन्व्हायर्मेंट अँड डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज) यांनी ‘डिसॅबिलिटी रेस्क्यू मॅनेजमेंट सिस्टिम’ विकसित केली आहे. या सिस्टीममुळे नैसर्गिक आपत्ती किंवा संकटकाळात दिव्यांग व्यक्ती नेमकी कुठे आहे, तिचे शारीरिक स्थान (फिजिकल लोकेशन) कुठे आहे हे जाणून त्यांना वेळेवर मदत पोहोचवणे शक्य होणार आहे” अशी माहिती नवी मुंबईतील सेंटर फॉर सस्टेनेबल एन्व्हायर्मेंट अँड डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हजचे (‘सीएसईडीआय’) प्रमुख आणि पर्यावरण संशोधक प्रमोद डबरासे यांनी दिली.

“प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने डी.आर.एम.एस. अद्याप प्राथमिक अवस्थेत असली तरी तिला विकसित करताना जीपीएस, जिओग्रोफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, नकाशे, संकटकाळात हवामान विभाग तसंच नागरिकांशी तत्काळ संवाद साधणाऱ्या वाहिन्या, दिव्यांगस्नेही आंतरजाल प्लॅटफॉर्म, आपत्ती निवारण प्राधिकरण आदी सर्व तंत्रज्ञान आणि व्यवस्थांचा समावेश करण्यात आला आहे”, असंही प्रमोद डबरासे यांनी सांगितलं

Related posts

कमल नागरी पतसंस्था राज्य कॅरम स्पर्धा – प्रशांत आणि अंबिका विजेते

एसटी बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; महिला, दिव्यांग, सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा नरसोबावाडी कोल्हापूर : प्रशांत मोरे – नीलम घोडके अग्रमानांकित 

Voice of Eastern

Leave a Comment