मुंबई :
मंत्रा मंगेश कुऱ्हे या बारा वर्षांच्या मुलीने एलिफंटा आयलंड ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर सागरी अंतर केवळ २ तास ५१ मिनिटात पोहून पूर्ण केले. मंत्राच्या या पोहण्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’मध्ये करण्यात आली आहे.
वाशी येथील फादर एँग्नल हायस्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिकणाऱ्या मंत्रा कुऱ्हे हिने नुकतेच एलिफंटा आयलंड ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर सागरी अंतर केवळ २ तास ५१ मिनिटात पोहून पूर्ण केले. तिने केलेल्या या विक्रमाची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. त्यामुळेच ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’मध्ये तिच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवर मंत्राने पोहण्याचा विक्रम केला आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मंत्रा कुऱ्हेच्या या यशाबद्दल कौतुक करून तिच्या पुढच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.