आज २७ फेब्रुवारी राज्यभरात मराठी भाषा दिन राज्यासह जगभरात साजरा केला जातो. सर्वच मराठी बांधवाना आपल्या या भाषेचा आणि संस्कृतीचा फार अभिमान आहे यात काहीच शंका नाही. मात्र अनेक परप्रांतीयांना देखील आपल्या या मराठी भाषेवर प्रेम आणि अभिमान तितकाच आहे. याच संदर्भात आम्ही काही लोकांशी संवाद साधला. नेमकं काय म्हणाले हे लोक हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ही सविस्तर बातमी.
गुजराती माणूस इतकी चांगलं मराठी बोलतो …
माझा जन्मच माझगांव ताडवाडी मध्ये झाला. माझ्या आजोबांपासूनच आम्ही इथे राहतो. सर्वांसोबत राहून मी देखील मराठी भाषा शिकलो. घरी जरी आम्ही गुजराती बोलत असलो तरी मित्रांसोबत किंवा बाहेर असताना मी मराठीतच बोलतो. मीच काय माझ्या घरी देखील सर्वाना मराठीत बोलतो आणि लिहता येतं. आमची मराठी ऐकून अनेकांना समजतच नाही कि हा मुलगा गुजराती असून इतकी छान मराठी कशी काय बोलतो.
– कृतिक सोलंकी
मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेवर आमचे प्रेम आहे. मुळात ज्या राज्यात तुम्ही राहता त्या मातीवर, संस्कृतीवर आणि तिथल्या भाषेवर प्रेम असायलाच हवे. आम्हाला गर्व आहे कि आमचा जन्म या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर झाला जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर असे अनेक थोर विचारवंतांचा अमर इतिहास आहे.
– अमेय यादव
मराठी भाषेवर देखील प्रेम
माझ्या घरात माझे वडील गुजराती आहे मात्र माझी आई मराठी. या मुळेच घरात दोन्ही संस्कार आम्हा दोन्ही भाव बहिणींवर पडले आहे. गुजराती भाषेवर जितकं प्रेम आहे तितकेच प्रेम आणि अभिमान मराठी भाषेवर आहे.
-मितेश वाघेला