Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने अमराठी भाषिकांसाठी मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुंबईमध्ये भारतातील अनेक राज्यातून लोक शिक्षणासाठी, व्यवसायासाठी आणि इतर कारणांसाठी येत असतात. मात्र मराठी भाषेच्या अपुर्‍या ज्ञानामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठीच मुंबई विद्यापीठाने अभाषिक मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे मराठी शिकण्याची इच्छा असणार्‍यांना याचा फायदा होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विभागाने ‘अमराठी भाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’त काही बदल केले आहेत. भाषिक कौशल्यांवर भर देऊन अभ्यासक्रमाची पुर्नरचना करण्यात आली आहे. २२ जून ते १५ जुलै २०२२ यादरम्यान या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ऑफलाईन/ ऑनलाईन असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात किंवा अन्य दोन केंद्रावर प्रवेश घेता येऊ शकतो. Parttimecourses.mu.ac.in या लिंकवरून ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी दिली.

प्रवेशासाठी या ठिकाणी संपर्क साधू शकता

  1. मराठी विभाग, रानडे भवन, पहिला मजला, विद्यानागरी, कलिना परिसर, सांताक्रूझ (पू), मुंबई विद्यापीठ, मुंबई. संपर्क – प्रवीण मुळम – ८१०८३०१६०२, तुषार मांडवकर ७७७४९४७४७६
  2. महाराष्ट्र कॉलेज, २४६, ए. जहांगीर,बोमन बेहरम रोड, मुंबई- ४००००८, समन्वयक, संपर्क डॉ. लिना प्रभू- ९८३३४९७११९
  3. श्रीमती चांदीबाई हिम्मथमल मनसुखानी महाविद्यालय, उल्हासनगर, संपर्क : अक्षय जमदाडे ८७६६९५८८७५

Related posts

चंद्रपूरमध्ये पूरात अडकलेल्या ८०० नागरिकांचे स्थलांतर

स्व. बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार आणि वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टाटा स्पोर्ट्स क्लबचा खळबळजनक विजय 

Voice of Eastern

Leave a Comment