Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

गोवंडीत तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक दोघांचा शोध सुरू

banner

मुंबई :

साकीनाका येथे महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर मुंबईत महिलेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. गोवंडीतील शिवाजी नगर येथे पहाटेच्या सुमारास कॅटरिंगच्या कामावरून घरी येत असलेल्या एका तरुणीवर चार जणांनी बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहेत.

गोवंडीतील शिवाजी नगर येथे राहणारी १९ वर्षीय पीडित तरुणी शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कॅटरिंगचे काम करून घरी येत होती. रोड नंबर १३ येथे ती आली असता एका तरुणाने तिची वाट अडवली. एवढ्या रात्री कुठे निघालीस असे बोलून ‘चल तेरे साथ बात करनी है’ असे बोलून तिला एका घराच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे अगोदरच तिघेजण होते. या चौघांनी मिळून तिचे तोंड दाबून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांना कॉल केला असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वीच आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार करून ठाणे, नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध घेत दोघांना अटक केली असून दोघांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

Related posts

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय टपाल विभागाच्या आधुनिक चेहेऱ्याचे होणार दर्शन

Voice of Eastern

राज्यात पुढील दोन- तीन दिवस पावसाची शक्यता

Voice of Eastern

निवड चाचणी खो-खो स्पर्धा – उस्मानाबादला किशोरांचे व सांगलीला किशोरींचे अजिंक्यपद

Voice of Eastern

Leave a Comment