Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

एमबीबीएसच्या परीक्षा धोक्यात; सहाय्यक प्राध्यापकांचा परीक्षेवर बहिष्कार

banner

मुंबई :

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व वर्गाच्या परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. मात्र एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर राज्यातील १९ सरकारी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या परीक्षा संकटात सापडल्या आहेत.

राज्यातील १९ महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक अस्थायी सहाय्यक प्राध्यापक मागील ३५ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर झालेला गुरुमंत्र या कार्यक्रमावर सहाय्यक प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला होता. तसेच नुकत्याच झालेल्या अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र तरीही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर सहाय्यक प्राध्यापकांनी २८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा संकटात सापडली असून, एमबीबीएस विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ अभियानाला गती; घाटकोपर रेल्वे स्थानकावर आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान

कल्याणमधील शिवसेनारूपी वृक्षाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई

शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला होणार; २३ ते ३० एप्रिलपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ

Leave a Comment