Voice of Eastern

मुंबई :

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर ६ मार्च २०२२ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते कल्याण, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल डाउन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेमार्गावरील दिवा ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सकाळी ८.३७ ते सायंकाळी ४.३६ पर्यंत सुटणार्‍या डाऊन धीम्या, अर्धजलद सेवा दिवा आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल डोंबिवली स्थानकात थांबतील.

हार्बर मार्ग

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई, वडाळा रोड स्थानकातून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणार्‍या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगावसाठी सुटणार्‍या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लॉक मुळे काही लोकल फेर्‍या रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेली आहे.

Related posts

स्वयं सहाय्यता गटातील महिलांच्या मुलांसाठी ई- लर्निग ॲप

Voice of Eastern

मुले पळवणार्‍या टोळीच्या अफवेने शाळांमधील उपस्थिती घटली

Voice of Eastern

पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण

Leave a Comment