मुंबई :
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) वार्षिक अधिवेशन १९ एप्रिल रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड प्लॅनेट यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी दिली.
मुंबईत होणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांपुढे असलेल्या विविध अडचणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण, शुल्क, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पालकांसोबत समन्वय ठेवण्यासाठी खास चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात मेस्टाकडे १८ हजाराहून अधिक शाळांची नोंदणी असून त्यातील प्रत्येक तालुका, जिल्हा स्तरावरील हजारो प्रतिनिधी या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे तायडे-पाटील यांनी सांगितले.
ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य टाळले