Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ३१ जानेवारीपासून ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.

म्हाडा भरतीप्रक्रिया विविध संवर्गातील ५६५ पदांसाठी घेण्यात येत आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे. ही परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी, २ फेब्रुवारी, ३ फेब्रुवारी, ७ फेब्रुवारी, ८ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे.

या संकेतस्थळावर मिळेले परीक्षेचे प्रवेशपत्र

परीक्षांबाबत अद्ययावत माहितीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळास नियमितपणे भेट द्यावी. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर २२ जानेवारीपासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/३१६५९/७५२४५/login.html लिंक उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांना मॉक लिंक उपलब्ध

विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध केली आहे. https://g०६.tcsion.com:४४३//OnlineAssessment/index.html?३१६५९@@M२११या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप समजून घेता येणार आहे. ऑनलाईन परीक्षेबाबत माहितीही यावर दिली आहे.

आक्षेप नोंदवण्यासाठी तीन दिवस

परीक्षेनंतर उमेदवारांना म्हाडातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर उमेदवारांना उत्तरासह पेपर पाहता येणार आहे. प्रश्नपत्रिका आणि Answer Key बाबत आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवारांना तीन दिवस दिले आहेत. आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरसाठी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली. त्या क्लस्टरसाठी Normalisation process (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_२०२१-d

Related posts

विक्रोळीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Voice of Eastern

शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावून मुंबईत १० वी १२ वीचे वर्ग सुरू

Voice of Eastern

व्यवसायिक महिला स्पर्धेत रचना नोटरीला; तर पुरुष गटात पश्चिम रेल्वेला अजिंक्यपद

Leave a Comment