Voice of Eastern
ताज्या बातम्यानोकरीमोठी बातमी

म्हाडा भरती : अभियंता संवर्गातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ६ व ७ जून रोजी

banner

मुंबई :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत या जाहीर सूचीतील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींची पडताळणी ६ व ७ जून २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील कागदपत्र पडताळणी सूचीमध्ये समाविष्ट उमेदवारांना टप्प्याटप्प्याने कागदपत्र पडताळणीकरिता बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.

कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव श्री. राजकुमार सागर यांनी केले आहे.

या उमेदवारांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी

६ जून २०२२ रोजी

पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता

 • कार्यकारी अभियंता संवर्ग : अनुक्रमांक १ ते १० उमेदवार
 • उपअभियंता संवर्ग : अनुक्रमांक १ ते १४ उमेदवार
 • सहायक अभियंता संवर्ग : अनुक्रमांक १ ते २४ उमेदवार
 • कनिष्ठ अभियंता संवर्ग : अनुक्रमांक १ ते ७५ उमेदवार

दुसर्‍या सत्रात दुपारी २.०० वाजता

 • कार्यकारी अभियंता संवर्ग : अनुक्रमांक ११ ते २० उमेदवार
 • उपअभियंता संवर्ग : अनुक्रमांक १५ ते २७ उमेदवार
 • सहायक अभियंता संवर्ग : अनुक्रमांक २५ ते ४८
 • कनिष्ठ अभियंता संवर्ग : अनुक्रमांक ७६ ते १५०

७ जून, २०२२ रोजी

पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता

 • कार्यकारी अभियंता संवर्ग : अनुक्रमांक २१ ते ३० उमेदवार
 • उपअभियंता संवर्ग : अनुक्रमांक २८ ते ४१ उमेदवार
 • सहायक अभियंता संवर्ग : अनुक्रमांक ४९ ते ७२ उमेदवार
 • कनिष्ठ अभियंता संवर्ग : अनुक्रमांक १५१ ते २२५

दुसर्‍या सत्रात दुपारी २.०० वाजता

 • कार्यकारी अभियंता संवर्ग : अनुक्रमांक ३१ ते ४० उमेदवार
 • उपअभियंता संवर्ग : अनुक्रमांक ४२ ते ५४ उमेदवार
 • सहायक अभियंता संवर्ग : अनुक्रमांक ७३ ते ९५ उमेदवार
 • कनिष्ठ अभियंता संवर्ग : अनुक्रमांक २२६ ते २९७ उमेदवार

Related posts

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर महिनाभरात २९ अपघात

Voice of Eastern

३० रुपयांसाठी गमावले पावणेपाच लाख रुपये

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा २ सप्टेंबरला निकाल

Leave a Comment