Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण या प्रादेशिक मंडळांतर्फे यावर्षी तब्बल १५ हजार ७८१ सदनिका बांधण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण विभागामध्ये सर्वाधिक ७ हजार ५९२ सदनिका बांधण्यात येणार असून, त्याखालोखाल मुंबईमध्ये ४ हजार ६२३, पुण्यात १ हजार २५३, नागपूरमध्ये १९५, औरंगाबादमध्ये १७६२, नाशिकमध्ये २२० आणि अमरावतीमध्ये १३६ सदनिका बांधण्यात येणार आहेत. या सदनिका बांधण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ७०१९.३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई मंडळातर्फेत उभारण्यात येणार्‍या ४ हजार ६२३ सदनिकांसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३७३८.४० कोटींची तरतूद केली आहे. मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकासासाठी २१३२.३४ कोटी, वडाळ्यातील अँटॉप हिल गृहनिर्माण योजनेसाठी २९ कोटी, वडाळ्यातील बॉम्बे डाईंग मिल योजनेसाठी ६४ कोटी, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १४५.५४ कोटी, बोरिवलीतील मागाठाणे येथील योजनेसाठी ५० कोटी, दिंडोशीतील खडकपाडा येथील गृहनिर्माण योजनेसाठी १५ कोटी, गोरेगावमधील पहाडी येथील गृहनिर्माण योजनेसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ), गोरेगाव प्रकल्पासाठी ४३५ कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प ‘टप्पा ब’ साठी ९१.१८ कोटी, गृहनिर्माण भवन इमारतीची दुरुस्ती व पुनर्विकासासाठी १५ कोटींची तरतूद केली आहे.

कोकण मंडळातर्फे ७ हजार ५९२ सदनिका बांधण्यात येणार असून, त्यासाठी १९७१.५० कोटी तरतूद केली आहे. वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी २०० कोटी, तर ठाणे जिल्ह्यातील मफतलाल येथील भूसंपादन व भूविकासासाठी १००२.५० कोटींची तरतूद केली आहे. पुणे मंडळामध्ये १ हजार २५३ सदनिकांसाठी ६६४.३२ कोटींची तरतूद केली आहे. पुण्यातील धानोरी येथे भूसंपादन व भूविकासासाठी ३८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये १९५ घरांसाठी ३८८.९७ कोटींची तरतूद केली आहे. मंडळाने भूसंपादन व भूविकासासाठी१६९.९२ कोटींची तरतूद केली आहे. औरंगाबादमध्ये १७६२ सदनिका उभारण्यासाठी १३६.९० कोटींची तसेच नाशिकमध्ये २२० सदनिकांसाठी ३५.७२ कोटींची तरतूदर केली आहे. अमरावतीमध्ये १३६ घरांसाठी ७५.५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Related posts

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांवर परिणाम नाही – शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

कमी वेळेत मदतकार्य करणारे ठाणे शहर पोलीस यंत्रणा राज्यात प्रथम

Voice of Eastern

‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’मध्ये हुल्लडबाजांचा गोंधळ

Voice of Eastern

Leave a Comment