Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

गिरणी कामगारांच्या सदनिकासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे म्हाडा काढणार निकाली

banner

मुंबई :

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी २८ जून २०१२ ते ९ मे २०१६ व ०२ डिसेंबर २०१६ रोजी काढलेल्या सोडतींमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडाकडून विशेष शिबीर घेण्यात येणार आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे २१ व २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या शिबिरांचे आयोजन केले आहे.

मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार गिरणी कामगार किंवा वारस यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र,  अपात्रतेच्या निर्णयासाठी मूळ नस्ती प्राधिकृत,  अपील अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. बहुतांश गिरणी कामगार, वारस यांनी सादर केलेली कागदपत्रे ही अपूर्ण असल्याने संबंधित प्राधिकृत अधिकारी, अपील अधिकारी यांनी यशस्वी अर्जदारांना आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविले. तसेच स्मरण पत्र सुद्धा पाठविली आहेत. मात्र, आवश्यक असणारी कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित यशस्वी अर्जदारांच्या पात्र, अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे प्रलंबित असणारी ही प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोडतींमधील ज्या यशस्वी गिरणी कामगार, वारस यांची पात्रता निश्‍चिती कागदपत्र सादर न केल्यामुळे झालेली नाही, अशा गिरणी कामगार, वारसांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीमध्ये नमूद यशस्वी गिरणी कामगारांनी या विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रासह सहभागी होण्याचे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

Related posts

लैंगिक समस्यांची जाहिरात करणार्‍या औषधा कंपनीला दणका

Voice of Eastern

आठवीतील मुलीवर दोन महिने केला लैगिंग अत्याचार

राणीच्या बागेतील पर्यटक व उत्पन्नात घट

Voice of Eastern

Leave a Comment