मुंबई :
मिलन लुथरियाच्या साकिया गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून हे त्याचं म्युजीकल पदार्पण आहे. सुमधुर संगीत त्याचा अफलातून कलाकृती आणि सुफी भावना घेऊन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
संगीताची अनोखी आवड असलेले मिलन लुथरिया म्हणतात “मला गीताच्या जगात अनेक अद्भुत प्रतिभांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. माझी संगीताची आवड सर्वज्ञात आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की गीतकार कसा विचार करतो. जेव्हा हे गाणे तयार झाले तेव्हा मी त्याच्या सुफी भावनेच्या प्रेमात पडलो. रचना पूर्ण होण्यासाठी मी पहिली ओळ ‘डमी’ ओळ म्हणून सुचवली. त्या रात्री विचार पुढे कसा न्यावा आणि गीतासाठी कोणाशी संपर्क साधावा असा प्रश्न पडला. मला गाढ झोप लागली. सकाळी फोन ऑन केल्यावर मला जाणवलं की मी झोपेतच गाणं लिहिलं होतं! त्यावर ‘स्लीप लिहीलेले’ होत.
जावेद अली यांनी गायलेल्या या गाण्याचा अंदाज नक्कीच मंत्रमुग्ध करून जाणारा आहे. सुलतान ऑफ दिल्ली या वेब सीरिज ची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. OTT गाणी रिलीझ करण्याची निवड करणे ही एक अनोखी शक्कल आहे परंतु ती सुलतान ऑफ दिल्ली मध्ये हे गाणं नक्कीच वेगळं ठरणार आहे.
१३ ऑक्टोबरपासून Disney plus Hotstar वर ही वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.