Voice of Eastern
ताज्या बातम्यामनोरंजनमोठी बातमी

मिलिंद गुणाजीचा मुलगा अभिषेक आणि राधा यांच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार

banner

मुंबई : 

अलीकडेच, दिग्गज अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा, अभिषेक गुणाजी यांचा राधा पाटीलसोबत विवाह पार पडला. विवाहसोहळा मालवणच्या वालावल येथील मंदिरात मित्रपरिवारा सोबत पार पडला. निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आता नवविवाहित जोड्याने मुंबई येथे जोरदार रिसेप्शन पार्टी दिली. 22 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील आलिशान हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडच्या नामांकित कलाकारानी या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली. गुणाजी कुटुंबातर्फे केलेल्या आयोजनात सर्व COVID-संबंधित सूचनांचे पालन केले गेले होते. माननीय पाहुण्यांच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत हा सुंदर सोहळा रंगला.

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर या भव्य रिसेप्शनला उपस्थित होते. भरपूर जल्लोष आणि उत्साहात अभिषेक व राधा यांनी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केली. या उत्सवाला अधिक आनंददायी करत जॅकी श्रॉफ, आदित्य ठाकरे, रोहित राजेंद्र पवार, रणजित पवार, गोविंद निहलानी, सतीश शहा, स्पृहा जोशी आणि सुबोध भावे यांनी उपस्थिती दिली. आनंदी जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या नव-वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत पाहुण्यांनी निरोप घेतला. अभिषेक आपल्या पत्नी राधासोबत या आनंदी क्षणांची सांगता करताना मीडिया जवळ म्हणाला, “हा सोहळा खास बनवणाऱ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार. ही संध्याकाळ यापेक्षा सुरेख होऊच शकली नसती.”

एक दशकाहून अधिक काळ पडद्यावर राज्य करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, हे कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यास आतुर आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले, “राधा आमच्यासाठी सूनेपेक्षा मुलीसारखी आहे. या कुटुंबाचा एक भाग म्हणून तिचे स्वागत करण्यासाठी आमचे सर्व मित्र आणि कुटुंब खरोखरच उत्साहित आहेत. कोविड प्रोटोकॉलमुळे, आम्हाला केवळ आमचे जवळच्या मित्र-परिवाराला आमंत्रण देता आले परंतु उपस्थितांचे मनःपूर्वक आभार, ही संध्याकाळ आपल्यामुळे अधिक रंगतदार झाली हे नक्की.”

Related posts

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत

थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धा : आग्नेल्स संघाला दुहेरी मुकुट

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची वाचन संस्कृतीसाठी अनोखी गुरुपौर्णिमा

Leave a Comment