Voice of Eastern

मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला गिरणी कामगारांचा हक्काचा लढा आज देखील सुरू आहे. पुन्हा एकदा राज्य सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गिरणी कामगार कृती संघटनेमार्फत १५ नोव्हेंबरला म्हणाजेच सोमवारी  म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मुंबईतील गिरण्या नसल्या तरी गिरणी कामगारांचे त्यावेळी असलेले प्रश्न मात्र आजही प्रलंबित आहे. या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी गिरणी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाला. या मोर्चानंतरही सरकारने कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

पैसे भरले तरी त्यांना अद्याप ताबा मिळाला नाही

गिरण्या बंद झाल्या नंतर गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा अध्यादेश सरकारने 2001 मध्ये काढला आज वीस वर्षे उलटल्यानंतरही अजून देखील अनेक गिरणी कामगारांना घरे मिळाली नाही आहेत. गिरणी कामगारांची माहिती संकलीत केले. त्यानुसार म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये 15 ते 16 हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात आली आहेत. गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देणे शक्य नसल्याने एमएमआरडीए क्षेत्रातील जमीन देण्याचे सरकारने ठरविले. त्यानुसार ठाणे जिल्हयातील ठाणे, अंबरनाथ व कल्याण तसेच रायगड जिल्हयातील पनवेल येथील जमिनीची पाहणी केली. त्यास आता 5 वर्षे होऊनही या जमिनीबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. तसेच पनवेल येथील एमएमआरडीएने बांधलेल्या घरांची सोडत होऊन कामगारांनी पैसे भरले तरी त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही.

१ लाख ६० हजार गिरणी कामगारांना घरे मिळणे अजूनही बाकी

नोंदणीकृत गिरणी कामगारांच्या संख्येनुसार १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांपैकी १ लाख ६० हजार गिरणी कामगारांना घरे मिळणे अजूनही बाकी आहेत. ठाणे, अंबरनाथ, कल्याण व पनवेल येथील 90 एकर जमीन शासनाने म्हाडाकडे हस्तांतरीत केली असती, तर ७० ते ८० हजार गिरणी कामगारांना घरे मिळाली असती. पण सरकार स्तरावर याबाबतचा निर्णय होत नसल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. कामगारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर म्हाडा कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी सांगितले.

Related posts

महाराष्ट्र लवकरच प्रदुषणमुक्त करणार – आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक

ठाणे जिल्ह्यातील या मंदिराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीय नोंद

Leave a Comment