मुंबई
आज गोकुळाष्टमी आणि उद्या दही हंडी उत्सव आहे.मात्र दही हंडी उत्सवावर सरकारने कोरोना चा प्रादुर्भाव पाहता निर्बंध घातले आहेत.मात्र याचा मनसेने निषेध करीत उद्या उत्सव करणारच असा पवित्रा घेतला आहे.घाटकोपर मध्ये तर आजच मनसेने पाच थराची हंडी फोडून सरकार चा निषेध केला आहे.घाटकोपर च्या भटवाडी विभागात मनसेने ही हंडी फोडून निषेध नोंदविला आहे.या वेळी एक गोविंदा सर्वात वर च्या ठरावर चढला आणि त्याने हंडी फोडली. या वेळी सर्व गोविंदानी मास्क लावत थर लावले होते. पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी देखील दहीहंडी वरती निर्बंध लावण्यात आलेले आहे. दहीहंडी साजरा करू नका असे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली होती. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली होती. काल त्यांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या मात्र यानंतरही त्यांनी काम सुरू ठेवले होते. आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई केली तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार यावरती मनसे नेते ठाम आहेत. आज मनसेने घाटकोपर येथे दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे
दुसरीकडे राज्य सरकारने दहिहंडी साजरी करण्याबाबतच्या मार्गदर्शनक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याता यावे, मानवी मनोरे उभे करून, एकत्र येऊन दहिहंडी उत्सव साजरा करू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दहिहंडीसाठी मार्गदर्शक सूचना
दहिहंडी उत्सव साधेपणाने घरी पुजा-अर्चा करून साजरा करावा
सार्वजनिक पुजा अथवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये
दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा
गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये
दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मानवी मनोरे उभारून दहिहंडी साजरी करू नये
त्याऐवजी रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवण्यात यावेत
केंद्र सरकारनेही दहिहंडी उत्सवात गर्दी झाल्यास कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असा इशारा दिला आहे