मुंबई
राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील जोमाने कामाला लागली आहे. पुन्हा एकदा मनसेची ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरे जोर लावताना दिसत आहेत. आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे प्रमुख नेत्यांची बैठक झाली यामध्ये पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे. राज यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. यावेळी त्यांनी एक सूचक वक्तव्य करत लवकरच एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी मिळेल असे देखील सांगितले.
कसा असेल राज यांचा दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेत्यांची आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे उपस्थित होते . महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तारीख ठरली असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले
६ डिसेंबरला पुण्यात पदाधिकारी बैठक आहे. १४ डिसेंबर ला मराठवाडा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक असणार आहे.१६ डिसेंबर ला पुणे येथे प. महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. कोकणबाबत तारीख ठरायची आहे
सहा रीजन ची पदाधिकारी बैठक असणार आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आयोध्या येथे जाणार याबाबत घोषणा केली होती मात्र कोरोनामुळे त्यांचा हा दौरा लांबणीवर पडला होता. मात्र या दौऱ्यावर देखील निर्णय झाला आहे फक्त तारीख करायची बाकी आहे असे नांदगावकर यांनी सांगितले. आमची आयोध्याला जायची तयारी झाली आहे असेही त्यांनी सांगितले.