मुंबई :
गेली दोन वर्ष राज्यावर असलेले कोणाच्या संकटामुळे अगोदरच सर्वसामान्य जनता लॉकडाऊन आणि वाढती महागाईमुळे सामान्य जनता त्रासली आहे. घरगुती वीज बिल याने देखील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. दरम्यान बेस्ट कंपनीकडूनही ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. आज या प्रश्नासंदर्भात महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांची मनसे नेत्यांनी आज भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आयुक्तांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थित होते.
बेस्ट कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला जो खर्च दिला आहे प्रत्यक्षात तो खर्च न करता एम इ आर सी कडून
मंजूरी घेऊन बेस्टने परस्पर वीज दर वाढवण्याचं काम केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेकदा बस अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती मात्र तरीदेखील या बाबतचा तोडगा निघत नव्हता यामुळे अखेर महापालिका आयुक्तांची भेट घ्यावी लागल्याचंही मनसे नेत्यांनी सांगितलं.
हा प्रश्न सोडवायचा असेल तर महानगरपालिकेने मुन्सिपल ऑडिटर समिती नेमावी. यातून नेमका पैसे किती खर्च केला आहे आणि त्यांचे बिल वाढवणं योग्य आहे का हे समोर येईल त्यामुळे ही समिती ताबडतोब नेमावी अशी मागणी देखील मनसेने केली आहे.दरम्यान या समितीच्या अहवालानंतर ग्राहकांचे वीज दर कमी करावे किंवा अधिक घेतलेले पैसे परत करावे लागतील, असंही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.