दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत तरीदेखील काही कामगार संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत यापैकी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकार मध्ये समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या कामगारांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता मनसे नेतेही आक्रमक होत राज्य सरकार वर टीका केली आहे. मनसे नेतेही आता आक्रमक होत राज्य सरकारला घेरत आहे.
एसटी महामंडळाने आता आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात एकूण ४६ आगारांतील तब्बल ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश जरी करण्यात आले आहेत. यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आता राज्यचे परिवहन मंत्री अनिल परब यांना जागे व्हायचा सल्ला दिला आहे.
एसटीच्या ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांना आज महामंडळाने निलंबित केले. 'एसटी कामगारांच्या भावना आणि मागण्या' जाणून घेण्यात अपयशी ठरलेले राज्य सरकार आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे आगीत तेल ओतायचं काम इमानेइतबारे करत आहेत!
सर्व डेपो बंद आहेत. @advanilparab आता तरी जागे व्हा! pic.twitter.com/hxHyjYiDiY— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) November 9, 2021
नेमकं काय म्हणाले कीर्तिकुमार शिंदे ?
सध्या राज्यभरात एसटीचा संप सुरु आहे. एसटीच्या ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांना आज महामंडळाने निलंबित केले आहे . ‘एसटी कामगारांच्या भावना आणि मागण्या जाणून घेण्यात हे राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे आगीत तेल ओतायचं काम इमानेइतबारे करत आहेत असा दावा देखील त्यांनी लगावला आहे. राज्यातील सर्व डेपो बंद आहेत. तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता तरी जागे व्हा असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे.
विभाग निलंबित- निलंबित कर्मचाऱ्याची संख्या
नाशिक- १७
वर्धा- ४०
गडचिरोली १४
चंद्रपूर १४
लातूर ३१
नांदेड ५८
भंडारा ३०
सोलापूर २
यवतमाळ ५७
औरंगाबाद ५
परभणी १०
जालना १६
नागपूर १८
जळगाव ४
धुळे २
सांगली ५८
एकूण – ३७६