नवी दिल्ली :
एमएक्स प्लेअरवर अलीकडेच प्रसारित झालेली आयपीएस अधिकारी नवनीत सेकेरा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन बनविलेली मालिका ‘भौकाल २’ने मनाची पकड घेणाऱ्या आपल्या कथाकथनामुळे आणि नेत्रदीपक अभिनयाने देशभरात खळबळ माजवून दिली आहे. मालिकेच्या यशस्वी आरंभाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेतच, पण आपल्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा भाग म्हणून एमएक्स प्लेअरने १९६१ मध्ये दिल्लीमध्ये स्थापन झालेल्या देशाच्या काही सर्वात जुन्या पोलीस स्टेशन्सपैकी एक असलेल्या तसेच २०२१ मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरविल्या गेलेलेल्या ऐतिहासिक सदर बाझार पोलीस स्टेशनबरोबर सहयोग साधला आहे. मालिकेमध्ये खऱ्या आयुष्यातील सिंघम – नवनीत सेकेरा यांची भूमिका साकारणारा मालिकेतील प्रमुख अभिनेता मोहीत रैना याने नि:स्वार्थ वृत्तीने देशसेवा करणाऱ्या विशेषत: जागतिक पॅनडेमिकच्या काळामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दीमधल्या पोलिसांच्या अथक परिश्रमांना अभिवादन केले आहे.
हा अनोखा आणि संस्मरणीय कार्यक्रम भारतातील जवळ-जवळ २० शहरांतील इतर असंख्य अधिकारी आणि प्रसिद्धी माध्यमांसमोर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आला. संपूर्ण देशाच्या वतीने असा आदर आणि सन्मान मिळताना पाहण्याची संधी देणारा हा दिवस आपल्या देशाच्या या शूर अधिकार्यांसाठी खरोखरीच अविस्मरणीय असा होता.
हिंमतबाज आयपीएस अधिकाऱ्याचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाविषयी मोहीत रैना म्हणाला, “वेबवरील काही अत्यंत सफाईदार आणि सर्वात यशस्वी क्राइम मालिकेचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. प्रेक्षकांकडून आमच्यावर जी प्रेमाची बरसात होत आहे, त्याने मी खरोखरीच भारावून गेलो आहे. या भूमिकेसाठी मला आयपीएस अधिकारी नवनीत सेकेरा यांच्या अत्यंत निकट संपर्कात राहून काम करण्याची संधी मिळाली, आपल्याला आणि आपल्या देशाला सुरक्षित राखण्यासाठी किती कष्ट घेतले जात असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. अशाप्रकारच्या या पहिल्याच व्हर्च्युअल उपक्रमामध्ये आम्हाला आमच्या या अधिकाऱ्यांचे त्यांच्या नि:स्वार्थी सेवसाठी आभार मानायचे होते. ते आपल्या देशाचे खरेखुरे सुपरहीरोज आहेत आणि भौकालची संपूर्ण टीम त्यांच्या शौर्याला सलाम करते.“