Voice of Eastern

मुंबई :

आपल्या नागमोडी वळणामुळे प्रवाशांना भूरळ घालणारी मोना डार्लिंगच्या प्रवासाला सोमवारी तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. लोअर परळ ते मिंट कॉलनीदरम्यान सोमवारी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी मोनो रेल्वे अचानक बंद पडली. त्यामुळे मोनो रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी २० ते २५ मिनिटे अडकले होते. त्यानंतर मोनोला टोईंग करून लोअर परळ स्थानकात आणण्यात आले आणि प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

सात रस्ताच्या दिशेने जाणार्‍या मोनो रेल्वेने दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास लोअर परळ स्थानक सोडले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर तिच्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण होऊन लोअर परळ ते मिंट कॉलनीदरम्यान ती बंद पडली. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरनाचे अभियांत्रीकी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुसरी मोनोरेल आणून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेलला ओढून लोअर परळ स्थानकात नेले. त्यानंतर प्रवाशांना लोअर परळ स्थानकात उतरविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक २० मिनिटांसाठी पूर्णत: ठप्प झाली होती.

Related posts

लाईव्ह सर्जिकलच्या माध्यमातून १५ जणांवर मोफत शस्त्रक्रिया

Voice of Eastern

जाणून घ्या : शिवकालीन इतिहासात वापरली जाणारी लिपी

मुंबई, ठाण्यावर धुळीचे साम्राज्य!

Leave a Comment