मुंबई :
आरटीई प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अवघ्या तीन दिवसांतच पालकांनी आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये तब्बल ३३ हजार ३०२ अर्ज पालकांकडून करण्यात आले. नागपूर व मुंबईतून आरटीईचे अर्ज सर्वाधिक अर्ज आले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत (आरटीई ) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ८ हजार ६१४ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये ९५ हजार ५३७ जागा आहेत. तांत्रिक अडचणीमुळे काही कारणास्तव १ फेब्रुवारी होणारी प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल ३० हजार ८८४ अर्ज आले. यामध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक १० हजार ३५ अर्ज आले आहे. त्याखालोखाल मुंबईमधून ३६९२, औरंगाबाद ३२०३, जळगाव १९७५ आणि अमरावती १३८६ इतके अर्ज आले आहेत. मात्र अद्यापही ११ जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील पालक आरटीई प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात होणार आहे याकडे लक्ष लावून बसले आहेत.
राज्यभरातून आलेले अर्ज
- नागपूर- १००३५
- मुंबई- ३६९२
- औरंगाबाद- ३२०३
- जळगाव -१९७५
- अमरावतीत- १३८६