Voice of Eastern

मुंबई : 

पारंपारिक धूम्रपानासाठी सुरक्षित पर्याय असल्याची जाहिरातबाजी करून अधिकाधिक युवा वर्गाला ई-सिगारेटकडे आकर्षित करण्यात येत आहे. मात्र ई सिगारेटच्या माध्यमातून शरीरात घेण्यात येणार्‍या धुरामध्ये तब्बल दोन हजार प्रकारचे रासायनिक पदार्थ असल्याचे संशाधनातून उघडकीस आले आहे. यातील कित्येक रासायनिक पदार्थांची माहिती उत्पादकांकडून लपवण्यात येत असून, त्यात विविध प्रकारचे कॅफिन असल्याचे उघडकीस आले आहे.

हे पण वाचा : राजावाडी रुग्णालयाच्या मार्गामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर; रुग्ण, कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

सिगारेटच्या तुलनेत ई-सिगारेट सुरक्षित असल्याची जाहिरात करण्यात येते. मात्र ई सिगारेटचा शरीरात जाणारा धूर सिगारेटच्या धुम्रापानापेक्षा अधिक सुरक्षित आहे, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. या धुरामधील रसायनांपासून किती धोका आहे, याचीही माहिती समोर आलेली नाही. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये ई सिगारेटच्या माध्यमातून शरीराला घातक ठरणारे सहा रासायनिक पदार्थ शरीरात जात असल्याचे आढळून आले आहे. त्यातील तीन हे यापूर्वी कधीच ई-सिगारेटमध्ये वापरलेले नव्हते. तर दोन उत्पादनांमध्ये कॅफिनचा समावेश आढळून आला. शरीराला घातक असलेले हे रासायनिक पदार्थ ई सिगारेटमध्ये वापरण्यात येत असल्याचे उत्पादकांकडून लपवण्यात येत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. धुम्रपान करणार्‍या व्यक्तीला अधिकची नशा किंवा किक मिळावी या हेतूने हे वापरण्यात येत असले तरी त्यामध्ये संशोधकांना कॅफीनव्यतिरिक्त तीन औद्योगिक रसायने, एक किटकनाशक आणि दोन फ्लेव्हिरिंग सापडली आहेत. त्यातून घातक परिणाम होण्याची आणि श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ई-सिगारेटवर केलेले संशोधन हे यापूर्वी केलेल्या संशोधनांपेक्षा वेगळे आहे. यापूर्वीच्या संशोधनांमध्ये सिगारेटमध्ये आढळणार्‍या धोकादायक रासायनिक पदार्थांवर अभ्यास केला होता. मात्र या संशोधनात कोणताही विशिष्ट हेतू समोर न ठेवता अभ्यास केला आहे. या संशोधनामध्ये धूम्रपानासाठी वापरलेल्या द्रव्यांची क्रोमॅटोग्राफी किंवा उच्च दर्जा मास स्पेक्टोमेट्रीद्वारा तपासणी करण्यापासून ते रसायन फिंगरप्रिंटींग तंत्रज्ञानापर्यंत सर्व गोष्टींचा शोध घेण्यात आला. रसायन फिंगरप्रिंटींग तंत्रज्ञान हे सांडपाण्यातील, अन्न व रक्तातील सेंद्रिय संयुग ओळखण्यासाठी वापरले जाते. धूर घेण्याची उत्पादने ही शेकडो फ्लेव्हरच्या माध्यमातून उपलब्ध असली तरी या संशोधन प्रक्रियेत एमआयसॉल्ट, व्हीयुज, ज्युल आणि ब्लू यांच्यातर्फे विक्री करण्यात येणार्‍या तंबाखू फ्लेवरच्या द्रवाची तपासणी केली गेली आणि त्यातून सातत्य तपासले गेले.

Related posts

यंदापासून इयत्ता दहावीसाठी आणखीन दोन नवीन विषय!

कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – अदिती तटकरे

‘कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहिम 31 जुलैपर्यंत

Leave a Comment