Voice of Eastern

मुंबई : 

उपचारासाठी मुंबईत आणलेल्या सासूच्या शस्त्रक्रियेच खर्च वाचवण्यासाठी सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील धारावी येथे घडली. याप्रकरणी धारावी पोलीसानी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सुनेला प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अँथोनी मुतुस्वामी (६१) असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. अँथोनी मुतुस्वामी हि गावी राहण्यास होती व मुलगा आपल्या कुटुंबियांसह धारावी परिरसरात राहण्यास आहे. गेल्या आठवड्यात अँथोनीचा मुलगा मुरुगन याने आईची खुशाली विचारण्यासाठी फोन केला असता आईने त्याला बोलताना दम लागतो अशी तक्रार मुलाकडे केली होती. मुलाने मी गावी येतो आणि तिकडे डॉक्टरला दाखवू असे त्याने आईला सांगितले होते. मात्र पत्नीने मुरूगनला गावी जाण्यास मनाई केल्यामुळे मुरुगन याने गावाहून मुंबईला येणाऱ्या एका नातेवाईकाच्या मदतीने आईला मुंबईला बोलावून घेतले होते.

आई धारावी येथे आल्यानंतर मुरूगनने स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले होते, मात्र डॉक्टरांनी आईला सायन गांधी मार्केट येथील एका रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुरूगनने आईवर उपचार सुरु केले असता डॉक्टरांनी आईला वाँल्वचा त्रास आहे, वाँल्वची शस्त्रक्रिया करावी लागेल त्यासाठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. आईची शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगून डॉक्टरांनी ३ लाख रुपये खर्च सांगितलं असे मुरूगनने पत्नी शांती (३७) हिला सांगितल्यामुळे ती नाराज झाली होती. गुरुवारी मुरुगन हा कामावर गेला होता असताना मुलीने फोन करून आजी चक्कर येऊन बाथरुम मध्ये पडली असे सांगितले असता मुरुगन घरी आला. व त्याने आईचा उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती निपचित पडली होती, तिच्या हातावर ओरखडे होते.मुरूगनने आईला सायनच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मुरुगन याने धारावी पोलिसा ठाण्यात पत्नी शांती हिच्याविरुद्ध तक्रार दाखल करून आईच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चातून पत्नीने आईची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सून शांती मुतुस्वामी हिला अटक केली आहे.

Related posts

कोरोनाचा सामना करण्यासाठी परिचारिकांची संख्या अपुरी

Voice of Eastern

ठाणे उपकेंद्र १५ दिवसांमध्ये सुस्थितीत होईल; मुंबई विद्यापीठाची खासदार श्रीकांत शिंदे यांना माहिती 

Voice of Eastern

स्वामी समर्थ कबड्डी : युनियन बँक, आयएसपीएल बाद फेरीत

Leave a Comment