Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मोटरमनच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा वाचला जीव

banner

मुंबई :

धावत्या लोकलच्या रुळावर झोपल्यास मृत्यू हमखास होतो, या भावनेने शिवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर झोपून मधुकर साबळे (५९) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे साबळे याचा प्रयत्न फोल ठरला व त्यांचे प्राण वाचले.

शिवडी रेल्वे स्थानकावर लोकल येत असल्याचे पाहून मधुकर साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने फलाटावरून खाली उतरत रेल्वे रुळावर झोपले. त्याचवेळी रेल्वे स्थानकजवळ आल्याने मोटरमनने लोकल धीमी केली होती. त्यामुळे साबळे रुळावर झोपल्याचे मोटरमनच्या लक्षात आले आणि त्यांनी प्रसंगवधान दाखवत तातडीने लोकल थांबवली. त्याचवेळी फलाटावर कर्तव्यावर असलेले वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल धनश्री पंडित शेलार आणि महिला होमगार्ड ऋतुजा मांडे यांनी क्षणाचाही विचार न करता रेल्वे रुळावर धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्या साबळे यांना रेल्वे रुळाच्या बाजूला केले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. मोटरमन आणि महिला कॉन्स्टेबल धनश्री पंडित शेलार आणि महिला होमगार्ड ऋतुजा मांडे या दोघीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts

हिवताप, डेंग्यूसाठी आणखी दीड महिने सतर्क राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Voice of Eastern

महावितरणच्या भांडूप परिमंडळाची ४७९ कोटींची थकबाकी

अपघातामुळे पाय गमावण्याची वेळ आली; जे जे रुग्णालयातील डॉक्टरांमुळे पुन्हा चालू लागला

Voice of Eastern

Leave a Comment