Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

banner

मुंबई : 

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही  वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. यावेळी आमदार पराग अळवणी, ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

१५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उपउच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय सबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

Related posts

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी सुरु

Voice of Eastern

आप करणार मुंबईच्या महापौरांचा सत्कार

गौराई मातेसह लाडक्या गणरायाला भरपावसात निरोप

Voice of Eastern

Leave a Comment