मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी सभारंभात जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे याना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उमेश झिरपे यांनी माऊंट एव्हरेस्टसह जगातील आठ अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अशा या आठ अष्टहजारी मोहिमांचे नेतृत्व करून त्या मोहीमा यशस्वी करणारे गिर्यारोहक उमेश झिरपे हे भारतातील एकमेव मोहीम नेते आहेत. तसेच त्यांनी गेल्या ४० वर्षांमध्ये हिमालयातील आणि सह्याद्रीतील शंभरहून अधिक यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. गिर्यारोहणातील या विशेष कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेद्वारे हा पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना प्रदान करण्यात येतो.