Voice of Eastern

मुंबई :

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून अधिकार्‍यांना आदेश देणारे
खासदार श्रीकांत शिंदे तुम्ही सुपर सीएम झालात का? या वर्तनाबद्दल महाराष्ट्राची माफी मागा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो आज वायरल झाला असून या प्रकारावर महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, ही राजकीय संस्कृती आहे का? वडील मुख्यमंत्री असेल तर त्याच्या अनुपस्थितीत कोणी येऊन खुर्चीवर बसू शकेल का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी असे वागायला नको होते. व्हीआयपी घरातील लोकांना प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. एक प्रकारची सामाजिक मर्यादा जपावी लागते. वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मुलगा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतो का असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

हेही वाचा : साहसी प्रेमींसाठी बेसिक रॉक क्लाइंबिंग कोर्स

Related posts

पर्यावरण बदलामुळे शहरांसाठी राबविणार ‘क्लायमेट फॅारवर्ड महाराष्ट्र’ उपक्रम

भवन्स कॉलेजमध्ये युवा स्वास्त्य लसीकरण…

Voice of Eastern

नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्राचे तगडे खो-खो संघ जाहीर

Leave a Comment