Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्रात समुद्र किनारे, जंगले, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे अशा विविध प्रकारच्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये नुकतीच जल पर्यटनाचीही भर पडली आहे. राज्यातील अशा वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधींचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, यासाठी दर्जेदार सोयी सुविधांसह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सज्ज असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी सांगितले.

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले आहे. एमटीडीसीमार्फत पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार्‍या सेवा आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणार्‍या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी मंत्रालय येथील त्रिमुर्ती प्रांगणात माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र २४ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

विविधांगी पर्यटन संधींमुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोधवाक्य आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात तारकर्ली येथे सुरू झालेली देशातील पहिली स्कुबा डायविंग इन्स्टिट्यूट हे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. समुद्रकिनार्‍यांसह गडकिल्यांचे ऐतिहासिक पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, ताडोबासारख्या जंगलांमधून वन्यजीवांचा अनुभव, ऐतिहासिक लेण्या अशी पर्यटकांची विविध आकर्षणाची ठिकाणे राज्यात आहेत. महामंडळामार्फत विविध पर्यटनस्थळांवर राहण्याच्या दर्जेदार सोयींसह अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांवर येऊन पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जयश्री भोज यांनी केले आहे.

एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचार्‍यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबत तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या २९ पर्यटक निवासे, ३० उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधीही मंत्रालयात उभारलेल्या या केंद्रामध्ये माहिती देण्यात येत आहे.

Related posts

पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह सात शहरांसाठी २५०० कोटींची योजना : अमित शाह यांची घोषणा

अवघ्या काही तासांत पाोलिसांनी मिळवून दिले अनू कपूरला लाखो रुपये

मराठी अभिनेत्रीसोबत उबेर टॅक्सीचालकाने केले गैरवर्तन

Leave a Comment