Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबई शहर, मुंबई उपनगर संघ निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरी

banner

मुंबई :

यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली  या जिल्ह्याच्या संघांनी “३२व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या दोन्ही गटात बाद फेरी गाठली. तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी देखील किशोर गटात बाद फेरीत प्रवेश केला.

परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडागरीत सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात  ठाण्याने रत्नागिरीला ३०-२८ असे चकवीत या गटात अग्रक्रम पटकाविला. तर रत्नागिरीने उपविजयी होत बाद फेरी गाठली. ठाण्याकडून प्रतीक्षा सणस, गौरी मांझी, तर रत्नागिरी कडून सारा शिंदे, पूर्णा दळवी यांनी उत्कृष्ट खेळ केला. द गटात कोल्हापूरने साताऱ्याला ३४-३० असे पराभूत करीत उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली. रायगडने सोलापूरला ४७-४७ असे बरोबरीत रोखल्यामुळे या दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली. फ गटात नाशिकने सिंधुदुर्गला ५९-१८ असे पराभूत करून या गटात अव्वल स्थान मिळवीत बाद फेरी गाठली. सिंधुदुर्ग देखील उपविजयी ठरले.

मुलांच्या ड गटात नंदुरबारने मुंबई उपनगरला ४५-३०असे पराभूत केले. सिद्धार्थ मुरूमकर, विश्वजित साळुंखे नंदुरबार कडून तर भावेश चिंदरकर, अर्षद चौधरी उपनगरकडून उत्तम खेळले. इ गटात कोल्हापूरने औरंगाबादला ३६-३२ असे पराभूत करीत बाद फेरी गाठली. शुभम रेपे, प्रेम पाटील या विजयात चमकले. दीपक डाके, संघर्ष इंगोले छान खेळले. फ गटात अहमदनगरने सांगलीला बरोबरीत रोखत बाद फेरीतील आपला मार्ग सुकर केला. सौरभ सिरसाट, गणेश नरवडे नगरकडून, तर युनास पिरजादे, अमित फाळके सांगली कडून उत्तम खेळले. अ गटात साताऱ्याने ठाण्याला ५५-२०असे नमवित या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ब गटात पुण्याने श्रीधर कदम, यश करपे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सिंधुदुर्गला ४७-१७ असे नमवले. सतीश मांजरेकर पराभूत संघाकडून उत्तम खेळला.

Related posts

“सक्षम ती” या संकल्पनेतून ठाण्यातील महिला रिक्षाचालक झाल्या `स्मार्ट’

वन सेवा केंद्र सुरू करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

भाषिक अल्पसंख्यांक विधी महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

Leave a Comment