Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबईतील दाम्पत्य अंमली पदार्थांच्या आरोपातून मुक्त; पुराव्याअभावी आरोपमुक्त करण्याची एमपी पोलिसांवर नामुष्की

banner

मुंबई :

अंमली पदार्थांचे खोटे आरोप असलेल्या आशेष आणि शिवांगी मेहता या मुंबईतील व्यापारी दाम्पत्याची एमपी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात आता दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आम्ही कसून व सर्वांगाने तपास केल्यानंतरही या जोडप्याविरुद्ध आम्हाला कोणताही पुरावा सापडलेला नाही आणि विशिष्ट वैयक्तिक शत्रुत्वामुळे त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते, असे सकृतदर्शनी स्पष्ट दिसत आहे.

जून 2023 मध्ये या मेहता जोडप्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला होता. जो एका मोठ्या घोटाळ्याचा भाग होता, असे आता स्पष्ठ झाले आहे. परंतु, त्यामुळे या दाम्पत्यांची बँक खातीही त्यावेळी गोठविण्यात आली होती. या प्रकरणाव्ही माहीती अशी की, कथितरीत्या ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या निसार खान (39) नावाच्या एका व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी 6 जून 2023 रोजी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं, की तो 17 लाख रुपये किमतीचं 142 ग्रॅम मेफेड्रोन हे ड्रग मेहता यांच्या सांगण्यावरून पुरवत होता. 2021मध्ये 88 लाख रुपये किमतीच्या वाहतूक करणारा ट्रक गेंदातोला पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी ट्रकमालक सत्पालसिंह आणि ड्रायव्हर प्रवीण यांना हरयाणातून शोधून काढलं आणि त्यांना अटक केली होती. या ट्रक ड्रायव्हरने छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यातल्या गेंदातोला पोलिस स्टेशनला मेमोरँडम पाठवून असा दावा केला होता की, तो मेहता दाम्पत्यासाठी काम करत होता. या आरोपासंदर्भातील वृत्त मिड-डेने 16 जून 2023 रोजी प्रसिद्ध केलं होतं. दरम्यान, गेंदातोला पोलिस स्टेशनमधले वरिष्ठ इन्स्पेक्टर ओमप्रकाश धुरू यांनी मात्र प्रवीणकडून असं कोणतंही मेमोरँडम आलं नसल्याचं सांगितलं.

त्यावेळीही विविध वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना आशेष यांनी सांगितलं होतं की, ते कधीही छत्तीसगडमध्ये गेलेले नाहीत आणि कधीही अशा व्यक्तीला भेटलेले नाहीत. ‘माझी कष्टाने जमविलेली संपत्ती हडप करण्यासाठी कोणी तरी या खोट्या प्रकरणात मला गोवत आहे,’ असे त्यांनी त्यावेळीही पोलिसांना व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितले होते.

परिस्थितीचा फायदा घेत डेन्रोन आरईए इट ट्रेड नावाच्या कंपनीनेही कथित दावा दाखल केला होता. मात्र, आपल्याला खोट्या प्रकरणात विनाकारण गोवलं गेलेलं असून, आपण निष्पाप असल्याचा त्यांचा दावा ते पोलिसांकडे करीत होते जेणे करून त्यांना अटक होऊ नये, परंतु तत्कालीन परिस्थितीजन्य घटनांमुळे न्यायालयानेही त्यांना अटकपूर्व जामीन त्यावेळी नाकारला होता, त्यामुळे या दाम्पत्याचे जगणे मुश्किल होऊन त्यांना मोठा आर्थिक भुरदण्डही सोसावा लागला होता. परंतु हा सगळा प्रकार खोटा होता व आपल्याला जाणीवपूर्वक त्यात गोवण्यात आलं होतं हे आता स्पष्ट झाल्याचा या दाम्पत्याचा दावा आहे.

आशेष मेहता हे डिजिटल करन्सी एंथुझिअ‍ॅस्ट आणि बिझनेसमन असून, ब्लिस कन्सल्टंट्स नावाची त्यांची स्टॉक ब्रोकिंग फर्म आहे. मेहता यांची ही फर्म आपले 200 कोटी रुपये देणं लागते, असा दावा एका कंपनीने केल्यामुळे मेहतांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्या संदर्भातला खटला कोर्टात सुरू आहे. या जोडप्याने सांगितले की, त्यांची नावे अज्ञात व्यक्तींच्या विशिष्ट गटाच्या सांगण्यावरून त्यांच्या खात्यातून पैसे लांबविण्यासाठी अशा विविध खोट्या, खट्याळ व मनगढन प्रकरणांमध्ये गोवली गेलेली आहेत. या दाम्पत्याचे वकील हेमंत इंगळे यांनी सांगितले की, हे दाम्पत्य निष्पाप होते त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या तपासाला सहकार्य केल्यामुळे ते या दोषारोपात निष्पाप असल्याचे समोर आले आहे.

डेन्रॉन कंपनीच्या घोटाळ्यात आशेष मेहता स्वतः पीडित आहेत. डेन्रॉनने केलेल्या कथित घोटाळ्यामुळे मेहतांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करणं शक्य होत नाहीये. अन्यथा गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास मेहतांची कंपनी तयार आहे. या संदर्भातलं अ‍ॅफिडेव्हटही मुंबई हायकोर्टात सादर केलेले आहे. आता डेन्रॉनने फाइल केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर असे दिसते की, त्यांनी पुणे कोर्टात सादर केलेली कागदपत्रे चुकीची आणि छेडखाड केलेली आहेत. डेन्रॉनने त्यात दिलेला पत्ताही चुकीचा असून, त्या पत्त्यावर त्यांचे ऑफिसही अस्तित्वात नाही, त्यामुळे या प्रकरणातही मेहता कुटुंबाला दिलासा मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे’, असे अ‍ॅड. हेमंत इंगळे यांनी सांगितले. मेहता दाम्पत्याने एमपी पोलिसांनी केलेल्या निष्पक्ष तपासबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

त्रास देण्यासाठी आशेषच्या वडिलांनाही अटक

आशेषचे वडील शैलेश मेहता यांना 2 डिसेंबर रोजी मोहाली म्हणून प्रसिद्ध असलेल्या एसएएस नगर जिल्ह्यातील सोहाना पोलिसांनी अटक केली होती. पंजाबमधील 78 वर्षीय व्यापारी वीरेश सिंघल यांच्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली होती. शैलेश, आशेष आणि त्याची पत्नी शिवांगी यांनी त्यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 1.20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सिंघल यांनी केला.
शैलेशचे वकील, हेमंत इंगळे यांनी, 78 वर्षीय वृद्धाची अटक घाईत करण्यात आली आहे, असा दावा करत प्रसार माध्यमांना सांगितले की, ‘सोहाना पोलिसांनी घाईघाईने काम केलेले दिसत असून कथित गुन्ह्याशी काहीही संबंध नसलेल्या एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे’. तक्रारदाराने आपल्यावर दबाव आणण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली आहे, असे आशेषचे म्हणणे आहे.

Related posts

छटपूजेवरून घाटकोपरमध्ये भाजप व राष्ट्रवादी आमनसामने

शाळांमध्ये १५ जूनला होणार प्रवेशोत्सव!

Voice of Eastern

एसएनडीटी विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

Voice of Eastern

Leave a Comment