Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुंबईत सुरक्षित वाटते, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी राज्यपालांकडे व्यक्त केली भावना’

banner

मुंबई :

मुंबई आम्हाला सुरक्षित वाटते. शिक्षणानंतर भावी करिअरही मुंबईमध्ये करायला आवडेल, असे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी राज्यपालांसोबत होळी साजरा करताना आपले मत व्यक्त केले.

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण व संशोधन करत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी १९ मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत राजभवन येथे होळी साजरी केली. यावेळी सर्व पाहुण्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी रंग लावला व पुरण पोळीची मेजवानी दिली. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन केले होते.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी

मुंबईत आपल्याला सुरक्षित वाटते तसेच शिक्षणानंतर भावी करिअर देखील येथे करायला आवडेल असे काही विद्यार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबईत शिक्षण घेत असलेले दक्षिण आफ्रिका, काँगो, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान, स्वित्झर्लंड, पॅलेस्टाईन, श्रीलंका, नेपाळ व बांगलादेश येथील विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांपैकी बहुतांशी विद्यार्थी वाणिज्य, विज्ञान व व्यवस्थापन शाखेचा स्नातक तर दोन विद्यार्थी आयआयटी मुंबई येथे पीएचडी करीत आहेत. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथचे आंतरराष्ट्रीय सचिव भूषण ठाकरे आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी उपस्थित होते.

Related posts

‘फास’मध्ये होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

देशातील ७५ महत्त्वाच्या ठिकाणी साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

Voice of Eastern

चित्ररथाच्या माध्यमातून दिला जाणार ऊर्जा बचतीचा संदेश

Leave a Comment