Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुंबईला पुढील वर्षात पाणीटंचाई नाही; सात तलावांमध्ये ३६७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा

banner

मुंबई

तलाव परिसरात मुबलक पाऊस झाल्याने यंदा मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तलावांमध्ये ३६७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी पाऊस लांबला तरी मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे देण्याची गरज भासणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ तलावांत १४ लाख १४ हजार ३५० दशलक्ष लिटर इतका (९७.७२%) पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ तलावांपैकी चार तलाव १६ ते २२ जुलैमध्येच भरले आहेत. यामध्ये १६ जुलैला तुळशी तलाव सर्वप्रथम भरला. त्यानंतर १८ जुलैला विहार तलाव, २२ जुलैला मोडक सागर तलाव आणि तानसा तलाव भरून वाहू लागला. त्यात आता भातसा तलावसुद्धा जवळजवळ ९७ टक्क्यांपेक्षाही जास्त भरला आहे. यंदा जुलैपासूनच चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ तलावांत १४ लाख १४ हजार ३५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावामध्ये उपलब्ध आहे. आता फक्त मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे दोन तलाव भरायचे बाकी आहेत. या दोन्ही तलावांत सध्या ९५ टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा आहे. अद्यापही पावसाळा सुरू असल्याने अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा हे दोन तलाव व भातसाही काठोकाठ भरून तलाव वाहण्याची शक्यता आहे.

तलावांची स्थिती

तलाव                 पाणीसाठा        टक्केवारी

  • अप्पर वैतरणा     २,१२,५८२         ९३.६३
  • मोडक सागर      १,२८,९२५         १००
  • तानसा                १,४४,८२८        ९९.८३
  • मध्य वैतरणा       १,८५,३८६        ९५.७९
  • भातसा               ७,०६,८८६        ९८.५८
  • विहार                   २७,६९८         १००
  • तुळशी                     ८,०४६        १००
  • एकूण                 १४,१४,३५०       ९७.७२

Related posts

कूपर रुग्णालयात वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग सुरु

Voice of Eastern

मुंबई पोलीस जिमखाना, स्पोर्ट्सफिल्ड यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पश्चिम रेल्वेचे ‘झिरो डेथ मिशन’

Voice of Eastern

Leave a Comment