Voice of Eastern

मुंबई :

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव अद्याप २५ टक्केही भरलेले नाहीत. मात्र महापालिकेने १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्च करून बांधकेला ’पवई’ हा तलाव मंगळवारी सायंकाळी ६ .१५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव म्हणून पवई तलावाची ओळख आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणार्‍या या तलावाचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी न वापरता प्रामुख्याने औद्योगिक कामासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

  • मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा पवई तलाव आहे.
  • मुंबई महापालिकेने ४० लाख रुपये खर्च करून या तलावाचे बांधकाम १८९० मध्ये पूर्ण केले.
  • तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे.
  • तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लिटर)
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Related posts

निकालासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या फेर्‍या नको -कुलगुरू

गर्भ पिशवी फुटल्याने बाळ पोटातच दगावले; शीव रुग्णालयाच्या डॉक्टरांना मातेचे प्राण वाचविण्यात यश

पोटनिवडणुकीसाठी जोगेश्वरी ते विलेपार्ले परिसरात दारू बंदी

Leave a Comment