मुलुंड :
मुंबईतील मुलुंड परिसरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात मध्ये डॉक्टर नसल्याने एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. निशा कसबे असं या महिलेचं नाव आहे.
या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचे धक्कादायक वास्तव समोर आलें आहे.रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.मुलुंड च्या पाच रस्ता परिसरात असलेल्या चा ज चचाणी पालिका प्रसूतिगृह मधली ही धक्कादायक घटना आहे.
मुलुंडच्या डंपिंग रोड परिसरात रहाणाऱ्या आठ महिन्याच्या गरोदर निशा कसबे याना या पालिकेच्या रुग्णालयात काल दुपारी दाखल करण्यात आले होते.मात्र काल मध्य रात्री त्यांची तब्येत बिघडली.मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते.अखेर दोन वाजता येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाना याची माहिती दिली.त्या नंतर त्या महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.प्रसूतिगृहमध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाही आणि या मुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. तर दोषींवर कडक कारवाई ची मागणी नातेवाईक करीत आहेत. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भेट देण्यास नकार दिला. यामुळे प्रशासनाची भूमिका अजूनही समोर आलेली नाही आहे.
महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात फक्त चार वाजेपर्यंत डॉक्टर असतात. त्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत एकही डॉक्टर नसतात. जर्सी तातडीने एका डॉक्टरची गरज लागल्यास पूर्व येथील सावरकर रुग्णालयात रुग्णाला पाठवण्यात येते मात्र इथेही तीच परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटासाठी हजारो कोटीचा खर्च करण्यात आले. मात्र पालिकेच्या रुग्णाला द्यायला तुमच्याकडे डॉक्टर नाही आहेत. पालिका अधिकारी सुरेश काकानी यांना पत्र लिहिणार आहे. या पत्रात या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे. तसेच मुलुंड पोलिस ठाण्याला देखील पत्र लिहिणार आहेत आणि त्यांना देखील गुन्हा दाखल संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले