Voice of Eastern

मुंबई:

कलिना कॅम्पसमधील नॅनो टेक्नोलॉजी विभागाच्या इमारतीमागे असलेल्या झोपड्या अखेर गुरूवारी सकाळी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने हटवल्या. यासंदर्भात युवासेना सिनेट सदस्या अ‍ॅड. वैभव थोरात यांनी तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र यासंदर्भात ‘व्हाईस ऑफ ईस्टन’ने ‘मुंबई विद्यापीठाचे झोपडपट्टी निर्माण केंद्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केलेल्या अखेर मुंबई विद्यापीठाने झोपड्यांवर केली.

हे ही वाचा – मुंबई विद्यापीठाचे झोपडपट्टी निर्माण केंद्र

कलिना कॅम्पसमधील चार एकरवर झोपडपट्टी उभी राहत असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्या जागेवर आता एसआरए अंतर्गत पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यामुळे सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना धारेवर धरले होते. त्यातच कलिना कॅम्पसमधील नॅनो टेक्नोलॉजी विभागाच्या इमारतीमध्ये उभ्या राहत असलेल्या झोपड्यांसदर्भात २०१८ पासून युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी व त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईच्या मध्यभागी कुर्ला येथील कलिनामध्ये विद्यापीठाला भलीमोठी जागा दिली. मात्र विद्यापीठाकडून कोट्यवधीच्या जागेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यावर ठिकठिकाणी झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे विद्यापीठाला जागा देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीकाही थोरात यांनी केली होती. यासंदर्भात ‘व्हाईस ऑफ ईस्टन’ने ‘मुंबई विद्यापीठाचे झोपडपट्टी निर्माण केंद्र’ या मथळ्याखाली बातमी दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई करत या झोपडपट्ट्यांवर कारवाई करत अखेर गुरूवारी त्या हटवल्या.

विद्यापीठाची जागा ही विद्यार्थ्यांसाठी असून, त्या जागेवर विद्यार्थ्यांसाठीच विविध उपक्रम राबवण्यात आले पाहिजेत. त्यावर बेकायदा झोपड्या उभ्या राहता कामा नयेत. या झोपड्यांवर उशिराने कारवाई झाली तरी कारवाई होणे महत्त्वाचे होते. तसेच यापुढे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कोणत्याही जागेवर अतिक्रमण होणार नाही याची विद्यापीठाने काळजी घेतली पाहिजे.
– अ‍ॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य, युवासेना

Related posts

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला ‘रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र” पुरस्कार

मुंबईत २ वर्षात ४ लाख उंदरांची कत्तल

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गिरविले सुरक्षेचे धडे

Leave a Comment