Voice of Eastern

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या पारंपारिक मानव्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए सत्र ५ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ९३.३९ टक्के लागला आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांचे १६ निकाल जाहीर करण्यात आले. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

बीए सत्र ५ या परीक्षेला १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार ८५२ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ९१ विद्यार्थी हे अनुपस्थित होते. या परीक्षेत १३ हजार ८७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्राचे तृतीय वर्ष बीए सत्र ५ समवेत बीए सत्र ५ व ६ (६०:४०), बीकॉम फायनान्शियल मार्केट सत्र ५ व ६ (७५:२५), बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र ५ व ६ (६०:४० ते ७५:२५), बीए सत्र ५ (७५:२५), तृतीय वर्ष एमएफएम सत्र २, बीकॉम सत्र ६, एमएमएस सत्र ३, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट सत्र ४, पाच वर्षीय विधी सत्र ९ व १०, तृतीय वर्ष एमएमएम सत्र २ व बीए सत्र ६(७५:२५) असे १६ निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. हिवाळी सत्रामध्ये झालेल्या परीक्षांपैकी १३५ परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले.

Related posts

कोकणात भात कापणीची लगबग; मात्र मजुरांची टंचाई

Voice of Eastern

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ

Voice of Eastern

जगाला थक्क व्हायला लागेल असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार – मुनगंटीवार

Voice of Eastern

Leave a Comment