Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शहर

मुंबई विद्यापीठाकडून पदमभूषण झाकीर हुसेन, उद्योजक शशिकांत गरवारे यांना मानद पदवी 

banner

मुंबई:

मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबला वादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डिलिट) हि मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही मानद पदवी १२ मे २०२२ रोजी विशेष दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाने मानद पदवी प्रदान करण्यासाठी विशेष दीक्षांत समारंभ गुरुवार, १२ मे २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने यावर्षी जागतिक किर्तीचे तबला वादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी )ही मानद पदवी तसेच गरवारे उदयोजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डिलिट) त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल ही मानद पदवी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतला यानुसार ही मानद पदवी देण्यात येत आहे. यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषीतज्ञ स्वामीनाथन यांना डिलिट ही मानद पदवी देण्यात आली होती. विशेष दीक्षांत समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या विशेष दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या युट्युबवर लिंकवर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

Related posts

भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने एक ज्यूसवर एक ज्यूस फ्री

येणाऱ्या नवरात्रोत्सव बाबत सकारात्मक चर्चा..

Voice of Eastern

खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई व पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंचा डंका

Leave a Comment