Voice of Eastern

मुंबई:

‘आई माऊलीचा उदो उदो’ करत आता येत्या काही दिवसातच मुंबईतील सर्वच देवी भक्त आपल्या माऊलीचे आगमन पार पडणार आहे. दर वर्षी आपल्या भव्य दिव्य देखाव्यासाठी मुंबईतील अनेक नवरात्रोत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत. यातलेच एक मंडळ म्हणजे मुंबईची माऊली या नावाने प्रसिद्ध असलेल्या नवतरुण मित्र मंडळ. या वर्षी मंडळाच्या वतीनेतेलंगणा- यदागिरी येथील प्रसिद्ध लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा- राज दरबारात अवतातणार आर्थर रोडची आई संतोषी माता 

काही दिवसांपूर्वीच सर्व गणेश भक्तांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारी आदेशाचे पालन करत मुंबईतील सर्वच गणेश भक्तांनी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे येणाऱ्या नवरात्रोत्सवसाठी. दर वर्षी आपल्या विविध सजावटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईची माऊलीचा गाभारा कसा असणार आहे या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाचे हे मंडळाचे २१ वे वर्ष असून तेलंगणा येथील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा साकार करणार आहे. या अगोदर कैलास पर्वत, मुंबईची लोकलआणि मुंबईचा इतिहास या सारख्या विविध देखावे या मंडळाने सादर केले आहेत.मंडळाचे प्रमुख आधार स्तंभ राजू राव यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक अतुल फदाले आणि त्यांचे सहकारी हा संपूर्ण देखावा साकार करणार आहे.

उत्सवासोबतच मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा हाती घेतले आहे. या मध्ये रक्तदान शिबिर, महाड चिपळूण पूरग्रस्तांना मदद, आरोग्य शिबीर, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदद असे अनेक उपक्रम पार पाडले आहेत.

मंदिराबद्दल अधिक माहिती?

हैद्राबाद पासून तब्बल ६० किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. स्कंध पुराणानुसार महर्षी ऋष्यश्रृंग यांचे पुत्र महर्षी यद यांनी भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी तपसचर्य केला. त्यांच्या या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी त्यांना नृसिंह रुपात दर्शन दिले. महर्षि यदच्या प्रार्थनेवर भगवान नृसिंह यांचे पाच रूप ज्वाला नृसिंह, गंधभेरंदा नृसिंह, योगानंद नृसिंह, उग्र नृसिंह आणि लक्ष्मी नृसिंह यदागिरी पर्वतावर विराजित झाले. जगातील एकमेव ध्यानस्थ नृसिंहची मूर्ती या मंदिरात स्थापित आहे.

 

ज्या प्रमाणे भगवान विष्णू यांनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वद केला , त्याच प्रमाणे आता मुंबईच्या माऊलीने देखील या कोरोना रुपी राक्षससाचा वद करावा आणि सर्वांची यातून सुटका व्हावी.

-अविनाश किरवे, अध्यक्ष , मुंबईची माऊली

Related posts

शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा – महेश तपासे

गिरगाव परिसरातील एलआयसीच्या मालकीच्या ८२ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाचा पुढाकार

Voice of Eastern

मुंबईतील जॉन्सन बेबी पावडर कंपनीचा परवाना कायमस्वरुपी रद्द

Voice of Eastern

Leave a Comment