Voice of Eastern

मुंबई : 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये मास्कचा वापर महत्त्वाचा आहे. मात्र नागरिकांकडून मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक घटना वारंवार उघडकीस येत असतात. मात्र नुकत्याच डिजिटल इंडिया फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये मास्क घालणार्‍या संख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईत ७६.२८ टक्के त्याखालोखाल हैद्राबाद ४५.७५ टक्के, शिमला ४०.५९ टक्के नागरिक मास्क वापरत आहेत.

कोरोनाविरोधातील लढाईत मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर राखणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मास्क न वापरणार्‍यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा पोलिस व नागरिकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. देशात मास्क वापरण्याबाबत डिजिटल इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कोणत्या शहरात किती नागरिक मास्कचा वापर करतात याची पाहणी करण्यात आली असता देशात मुंबईत मास्क वापरणार्‍यांची संख्या सर्वाधिक आढळली.

मास्क वापरणार्‍यांची शहरनिहाय आकडेवारी

मुंबई ७६. २८ टक्के, हैद्राबाद ४५.७५ टक्के, शिमला ४०.५९ टक्के, कोलकाता ४०.५५ टक्के, जम्मू ३९.४० टक्के, चेन्नई ३८.९० टक्के, गुवाहाटी ३८. ८३ टक्के, दिल्ली ३८.२५ टक्के, चंदीगड ३६.३० टक्के, पुणे ३३.६० टक्के आणि रायपूर २८.१३ टक्के

Related posts

भारताने केला कोविड -19 लसीकरणाचा दोनशे कोटी मात्रांचा टप्पा पार

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही डॉ. आंबेडकर यांची त्रिसूत्री आजही प्रासंगिक : राज्यपाल

होळी रे होळी पुरणाची पोळी…

Leave a Comment