Voice of Eastern

मुंबई :

बदलत्या वातावरणामुळे काही दिवसापासून मुंबईतील तापमानात कमालीचा बदल हाेत आहे. रात्री गारठा तर दुपारी उकाडा अशा वातावरणामुळे मुंबईकरांचे आराेग्य बिघडत असून सर्दी, ताप व  घशाला खवखवचा त्रास मुंबईकरांना सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. साथीचा ताप की काेराेनाचा ताप? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे.

मुंबई शहर व उपनगरातील बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर सध्या तापाने फणफणत आहेत. वातावरणात झालेल्या कमालीच्या बदलामुळे मुंबईकर ताप, सर्दी व घसा खवखवणे यामुळे बेजार झाले आहेत. खासगी दवाखान्यात दिवसभरात उपाराचासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ३० ते ३५ रुग्ण हे साथीच्या तापाने त्रस्त असल्याचे डॉक्टर सांगतात.  मुंबईत चिकनगुनिया, डेंग्यू व मलेरयाचे रुग्णांमध्ये वाढ झाले असल्याचे पालिका आराेग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डॉक्टरांकडून नागरिकांना आवाहन

  •  पाणी उकळून पिणे
  • ताप आल्यास हलगर्जीपणा न करता त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घेणे
  •  उघड्यावरील पदार्थ न खाणे
  •  डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे
  •  आरटीपीसीआर चाचणी करून घेणे

Related posts

अमराठी भाषिकांचे मुंबई विद्यापीठ घेणार मराठीचे वर्ग

बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

नर्सच्या वादात गमावला चिमुकल्याने जीव

Voice of Eastern

Leave a Comment