Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

निवडणुकीसाठी महापालिका सज्ज; साहित्य खरेदी जोरात

banner

मुंबई :

मुंबई महापालिकेची निवडणूक तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पालिका निवडणूक विभागाने निवडणुकीसाठीची आवश्यक तयारी सुरू केली आहे. निवडणूक साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया आणि वॉर्डनिहाय मतदार याद्यांचे काम वेगाने सुरु असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्चला संपली. परंतु, त्यापूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने सध्या पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नेमणूक केली आहे. निवडणुकीसंदर्भातील निर्णय गुलदस्त्यात असला तरी कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे पालिकेने त्यांची निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा पुरवठादारांकडून वाढीव किंमतीत साहित्य मिळू नये यासाठी आताच आवश्यक साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून हमीपत्रही घेण्यात येणार आहे. साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेसाठी १८ झोनमध्ये विभागणी करून प्रकिया राबवण्यात येत आहे. मात्र पुरवठादाराने निवडणूक साहित्याचा पुरवठा करण्यास काही कारणास्तव नकार दिल्यास दुसर्‍या क्रमांकावरील पुरवठादाराला साहित्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Related posts

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा : आरोग्य विभागाचे आवाहन

Voice of Eastern

अंगारकीसाठी मंदिर खुले ठेवण्याबाबत सिद्धिविनायक मंदिराचा महत्त्वाचा निर्णय

Voice of Eastern

तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची ही भन्नाट आयडिया!

Voice of Eastern

Leave a Comment